बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (15:43 IST)

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सहाजणांना केले दोषमुक्त

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत असे सांगत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह सहा जणांना दिलासा मिळाला आहे.
 
दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करुन आरोपपत्र दाखल केले होते. त्यात पुरावे असल्याचेही म्हटले होते. पण, कोर्टात आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे एसीबीने दिले नाही. त्यानंतर न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यात आपल्यावर केलेले आरोप निराधार असून दोषमुक्त करावे असे म्हटल होते. या अर्जावर आज न्यायालयाने निकाल दिला.
 
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीकडून त्याचा तपास सुरु झाला. भुजबळांची या प्रकरणात २०० कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली. तपासा दरम्यान भुजबळांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याचे म्हटले गेले. त्यानंतर भुजबळांना अटक झाली. २०१६ ते २०१८ मध्ये इतक्या कालावधीत ते तुरुंगात होते. ४ मे २०१८ ला त्यांचा जामीन मंजूर झाला.