मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (20:09 IST)

मुंबईत टेम्पोमध्ये महिलेवर बलात्कारानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकला

30 वर्षीय महिलेवर कथित बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी रात्री ही महिला शहरातील साकी नाका परिसरात असलेल्या खैराणी रोडवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. सध्या या महिलेवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सांगितले जात आहे की बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉडही घातला होता.
 
या जघन्य गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव मोहन चौहान असे सांगितले जात आहे. 45 वर्षीय मोहन चौहानला पोलिसांनी घटनेच्या काही तासांच्या आत पकडले. पोलिसांनी सांगितले की, कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती की एक पुरुष एका महिलेला वाईट रीतीने मारत आहे.
 
ही माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. येथे ती महिला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत महिलेवर ही क्रूरता करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
वाहनामध्ये रक्ताचे ठिपकेही आढळून आले. डॉक्टरांच्या मते, महिलेची प्रकृती गंभीर आहे. आरोपी चौहानला अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.