कर्जत मधील तिहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात दोन दिवसांपूर्वी आई वडील आणि मुलाचे मृतदेह आढळले असून राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस या तिहेरी हत्याकांडाचा शोध लावत असताना त्यांनी हत्याकांडाचा शोध लावला आहे. आरोपी कोणी दुसरा नसून मयत मदनचा सक्खा भाऊच आहे.रेशनकार्डावरील नाव वेगळे करत नाही तसेच घर त्याचा नावावर करत नाही म्हणून आरोपीने भाऊ भावजय आणि त्यांच्या मुलाला ठार केले.
आरोपी हनुमंत पाटील हा मयत मदनाचा सक्खा भाऊ असून शेजारीच राहत होता. आरोपी हनुमंताला घर आणि रेशनकार्ड वेगळे करून घ्यायचे होते. मदन ते काही करून देत नव्हता. या कारणास्तव दोघांमध्ये वाद होत होते. या बाबत त्याने तक्रार केली होती.
आरोपी हनुमंत ने कंटाळून भावाला मारण्याचा कट रचला त्याने मामा कडे पोशिरे गावात जाण्याचा बनाव केला आणि तो तिथून मध्यरात्री चिकणपाडा आला आणि त्याने कुऱ्हाडीने भाऊ मदन त्याची गर्भवती पत्नी आणि मुलाला ठार मराऊन मृतदेह ओढ्यात फेकून दिले. मुतदेहाच्या अंगावर जखमेच्या खुणा होत्या. त्यावरून हे हत्याकांड असल्याचे पोलिसांना समजले. सीसीटीव्ही फुटेज आणि कपड्यांवरून हा सगळा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी मदनच्या भावाची कसून चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी हनुमंताला अटक केली असून पुढील प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Edited by - Priya Dixit