शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (11:36 IST)

भीमा-कोरेगाव प्रकरणी पवार यांना समन्स बजावा

भीमाकोरेगाव हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशी आोगाने समन्स बजावावे, अशी विनंती अ‍ॅड. प्रदीप गावंडे यांनी आयोगाकडे केली आहे. यासंबंधी त्यांनी आोगाकडे एक अर्ज दाखल केला आहे.
 
भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली होती. याच आयोगाने आता पवार यांना याप्रकरणी तत्काळ साक्ष नोंदवण्यासाठी, अशी मागणी अ‍ॅड. गावंडे यांनी अर्जाद्वारे केली आहे.