रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (09:28 IST)

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात उघड

operation
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून मृत्यूचे कारण समजले आहे.त्याचा मृत्यू डोक्यात गोळी लागून अतिस्रावामुळे झाला आहे. 
 
सोमवारी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून बदलापूरला नेट असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला या गोळीबारात एक पोलीस सहाय्यक निरीक्षक जखमी झाले. नंतर प्रत्युत्तर पोलिसांनी गोळीबार केला असून त्याच्या डोक्यात गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

त्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून तब्बल सात तास शवविच्छेदन केले त्याची व्हिडीओग्राफी देखील करण्यात आली असून अक्षयच्या मृत्यूचे शवविच्छेदन अहवाल समोर आले असून त्याचा मृत्यू डोक्यात गोळी लागून अतिस्रावामुळे झाल्याचे उघड आले आहे.

त्याचे मृतदेह अद्याप कळवाच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहे. कुटुंबीयांनी मृतदेह अद्याप ताब्यात घेतले नसून जो पर्यंत कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेत नाही तो पर्यंत मृतदेह शवागारात ठेवले जाणार. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit