शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (12:58 IST)

कल्याण येथे अंगरक्षक बनून व्हीआयपी ताफ्यात शिरणाऱ्याला अटक

arrest
कल्याणच्या खडकपाडा येथे एक व्यक्ती स्वतःला अंगरक्षक म्हणून व्हीआयपी ताफ्यात प्रवेश करताना पोलिसांनी त्याला पकडले. संतोष गोस्वामी असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या कडे पोलिसांना बनावट बंदुकीचा परवाना देखील मिळाला.

हा व्यक्ती छत्तीसगडचा रहिवासी असून त्याने बंदुकीच्या बनावट परवान्याच्या आधारे मुंबईतील व्हीआयपी एजन्सीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी ह्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याच्याकडे अनेक शस्त्रे सापडली असून त्यात 12 बोअरच्या बंदुकी आणि जिवंत काडतुसांचा समावेश आहे. सर्व शस्त्रांचे पर्वांतें बनावट असल्याचे पोलिसांना आढळले.

त्याच्या कडे एवढे शस्त्र आणि त्याचे बनावट परवाने कुठून आले, या आधी देखील तो व्हीआयपी ताफ्यात शिरला आहे का पोलीस या प्रश्नांचा शोध घेत आहे. त्याला असं करून कोणती मोठी घटना घडवायची होती का? त्याने फसवणूक का केली याचा तपास पोलीस करत आहे. अद्याप त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
Edited by - Priya Dixit