बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:48 IST)

अंगारकीला बाप्पा पावला! उघडले सिद्धीविनायकाचे मंदिर (घ्या Live दर्शन)

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्री सिद्धीविनायक गणपती अंगारक चतुर्थीच्या दिवशीच भक्तांना पावला आहे.गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले येथील श्री सिद्धीविनायकाचे मंदिर आजच उघडले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हे मंदिर बंद होते. राज्य सरकारने गेल्या महिन्यात राज्यभरातील धार्मिक स्थळे खुली केली. मात्र, सिद्धीविनायक मंदिर उघडण्यात आले नाही. आज अंगारक चतुर्थीच्या मुहूर्तावर भक्तांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी बाप्पाच्या दर्शनासाठी आहे. आपणही घरबसल्या घेऊ शकता बाप्पाचे लाईव्ह दर्शन.
 
दोन वर्षांनंतर दर्शन
गेल्य दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. . त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेता आले नाही. तब्बल दोन वर्षानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आहे. कोरोनाच्या काळात सर्वजण अस्वस्थ झाले होते. आता कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावो आणि सर्वांना आरोग्यपूर्ण जीवन लाभो, अशी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केल्याचे एका भक्ताने सांगीतले.
सकाळी 7 पर्यंत भाविकांना घेता येणार दर्शन
सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी नंदा राउत यांनी याबाब बोलताना  सांगितले की कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिर खुले करण्यात आले आहे, भाविकांना ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जाईल, अडीच हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाला सोमवारी रात्री 1:30 वाजता  सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल.