मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (23:38 IST)

लोकल ट्रेनच्या नव्या वेळांवरुन भाजपा आक्रमक

BJP is aggressive from the new local times
राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून 1 फेब्रुवारीपासून लोकल धावणार. परंतू सर्वसामान्यांसाठी वेळेचं बंधन असणार आहे. त्यावरुन विरोधी पक्षात असलेला भाजपा आक्रमक झाला आहे.
 
मुंबईकरांसाठी आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची अपेक्षा असताना सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे अशी टीका सुद्धा भातखळकर यांनी केली आहे. ते म्हणाले की सर्वसामान्यांसाठी तात्काळ लोकल सुरु करावी.