शुभमंगल सावधान !कॅनडा-डोंबिवली ऑनलाइन मंगलाष्टकं,अनोख्या पद्धतीत विवाह लग्न सोहळा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लग्न पुढे ढकललेले गेले.काहींनी तर चक्क लॉक डाऊन मध्ये देखील लग्न सोहळा मोजक्या नाते वाईकांच्या उपस्थितीत घरातच उरकला.असाच एक लग्न सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.विशेष म्हणजे की वर आणि वधू हे दोघे सातासमुद्रा पार होते.तरी ही हा विवाह सोहळा ऑनलाईन पद्धतीने विधिवत पार पडल्याचे वृत्त मिळत आहे.
डोंबिवली पूर्व मधील भोपर गावाच्या परिसरात डॉ.हिरामन चौधरी यांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी कॅनडा गेला आणि तिथेच स्थायिक झाला.तिथेच त्याचे मनदीप कौर या तरुणीवर प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरविले.
दोघांनी घरात आपल्या लग्ना बद्दल सांगितले आणि त्यांना घरातून परवानगी मिळाली.परंतु मधेच कोरोनाचं संकट आडवे आले 2020 मध्ये लागणाऱ्या लॉक डाऊन मुळे त्यांना भारतात येणे शक्य नव्हते .त्यामुळे होणारे लग्न पुढे ढकलण्यात आले. लॉक डाऊन लागल्यामुळे त्यांनी अखेर ऑनलाईन पद्धतीने लग्न करण्याचे निश्चित केले आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांच्या कुटुंबीयांनी कुरिअरद्वारे थेट कॅनडाला पाठविले.
भूषणच्या वडिलांनी भटजींच्या मदतीने विधिवत आपल्या एकूलत्या एक मुलाचे लग्न ठरलेल्या मुहूर्तावर मोजक्या नातेवाईकांच्या साक्षीने ऑनलाईन पद्धतीने पार पाडले.ऑनलाईन विवाह सोहळा असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नव्हती.नातेवाईकांनी ऑनलाइनच अक्षदा टाकून वधू-वरास आशीर्वाद दिले.लग्नानंतर हिरामन चौधरी यांनी आनंद व्यक्त करून इतरांना देखील कोरोनाच्या संकटाला बघता अशाच पद्धतीने लग्न सोहळा करण्याचे आवाहन दिले आहे.