बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (11:03 IST)

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

rain
गुरुवारी सकाळी मुंबईतील अनेक भागात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मुबंईत आणि कुर्ल्या भागात पावसामुळे रस्त्यात पाणी साचले. हवामान खात्यानं येत्या रविवारी १८ जून रोजी मुंबई. पालघर आणि ठाणे भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. 
 
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मच्छीमाराना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वी लवकर येण्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप मान्सून आलेला नाही. उद्या पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्राच्या किनारी पट्टीसह लगतच्या भागात ४० ते ५० किमी प्रतितासाच्या वेगाने वाऱ्याचा वेग ६० किमी पर्यंत जाऊ शकतो.  रविवार पासून मान्सून अनेक भागात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.