शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (16:51 IST)

चिंचपोकळी: गणेशा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना मारहाण

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्ष नंतर मोकळ्या हवेत भाविक कोरोना निर्बंध मुक्त सण साजरे करत आहे.दोन वर्षा नंतर गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे. भाविकांची गर्दी सार्वजनिक गणेश पंडाल मध्ये बसलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी होत आहे. लालबाग, चिंचोकली या भागात शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. अशा मध्ये चिंचपोकळीचा सार्वजनिक मंडळातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. चिंचपोकळीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून एका गणेश भाविकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

चिंचपोकळी चिंतामणी गणेशाच्या प्रवेश द्वारावर लावलेल्या बेरिकेड्सला ढकलून भाविकांची गर्दीची लाट आत आली. त्यांना थांबवण्यात आणि नियंत्रण करण्यात कार्यकर्त्याचा राग अनावर झाला आणि त्याने भाविकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरीचे प्रकरण समोर येत आहे. या व्हिडीओ मध्ये भाविकांना लाथाबुक्याने मारहाण केल्याचे दिसत आहे.त्यामुळे या कार्यकर्त्यांची दादागिरी उघड येत आहे.