सिडकोच्या लॉटरीधारकांना १ जुलै २०२१ पासून टप्प्याटप्प्याने मिळणार घराचा ताबा

sidko
नवी मुंबई| Last Modified शनिवार, 22 मे 2021 (11:47 IST)
घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिडकोच्या लॉटरी धारकांसाठी खूशखबर आहे. सिडको महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील अर्जदारांना १ जुलै २०२१ पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात सर्वत्र विकासकामांना खीळ बसलेली असताना सिडको महामंडळाने मात्र सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करीत युद्धपातळीवर घरांचे बांधकाम पूर्ण करून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहोत.
नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील देशातील एक अग्रणी प्राधिकरण असणाऱ्या सिडको महामंडळाने बांधकाम क्षेत्रातही आपले कर्तृत्व सिद्ध केले. आपल्या स्थापनेपासूनच समाजाच्या सर्व आर्थिक स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे ध्येय आहे. सिडको गृहनिर्माण त्यात सातत्य हे निश्चितच सिडकोच्या सर्वसमावेशक विकासाची निदर्शक आहे. महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना २०१८-१९ अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये सुमारे २५,००० घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता साकारण्यात आली होती. या योजनेतील घरांचा ताबा, गृहनिर्माण योजनेच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर २०२० पर्यंत देणे विहित होते. परंतु सन २०२० च्या प्रारंभी आलेली कोविड-१९ महासाथ आणि त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे बहुतांशी विकास प्रकल्पांचे काम मंदावले किंवा ठप्प झाले. सिडको महागृहनिर्माण योजना त्यास अपवाद नव्हती.
सार्वजनिक परिवहन सेवांवरील निर्बंध, मजुरांचे स्थलांतर अशा विविध कारणांमुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर १५ एप्रिल २०२१ पासून राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्येही या समस्या कायम आहेत. या काळात सर्वत्र निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना सिडकोला करावा लागला. परंतु ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीनुसार या सर्व अडी अडचणींवर मात करून पुरेसे मजूर तैनात करून, सिडकोतील अभियंते आणि अधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करीत योजनेतील घरांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. किंबहुना ‘संकटामध्ये संधी शोधणे’ हेच सिडकोच्या आजवरच्या यशाचे गमक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील विजेत्या अर्जदारांना देण्यात येणारा घरांचा ताबा हे कोविड-१९ महासाथीच्या काळात सर्वांत लवकर पूर्ण झालेल्या महाप्रकल्पाचे देशातील एकमेव उदाहरण आहे.
सदर महागृहनिर्माण योजनेतील ज्या अर्जदारांनी घरांचे सर्व हप्ते भरले आहेत, त्यांना बाकी असलेले किरकोळ शुल्क भरण्यास १ जून २०२१ पासून १ महिन्याची मुदत देण्यात येईल. १ जुलै २०२१ पासून घरांचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. हफ्ते थकीत असलेल्या अर्जदारांना यापूर्वीच हफ्ते भरण्याकरिता ३१ जुलै
२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

म्हणून छोट्या भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला, हडपसरातील ...

म्हणून छोट्या भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला, हडपसरातील घटना
पुण्याच्या हडपसर परिसरात काल सकाळी बाबू उर्फ शिवाजी गवळी(23) या तरुणाचा मृतदेह सापडला ...

मुंबई पोलिसांनी सायन मधून 21 कोटीचे ड्रग्स जप्त केले, एकाला ...

मुंबई पोलिसांनी सायन मधून 21 कोटीचे ड्रग्स जप्त केले, एकाला अटक
मुंबई: मुंबई पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सायन भागातून तब्बल 21 ...

फेसबुक कंपनी फेसबुकचे नाव बदलण्याच्या तयारीत, फेसबुकचे नाव ...

फेसबुक कंपनी फेसबुकचे नाव बदलण्याच्या तयारीत, फेसबुकचे नाव लवकरच बदलणार
Facebook Inc, कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत आहे. द व्हर्ज,ने या ...

प्रवाशांनी लक्ष द्या ! रेल्वे मंडळा कडून दिवाळीसाठी विशेष ...

प्रवाशांनी लक्ष द्या ! रेल्वे मंडळा कडून दिवाळीसाठी विशेष गाड्या चालणार
गेल्या 2 वर्षा पासून कोरोना मुळे गाड्या बंद होत्या आणि सण देखील साध्या पद्धतीने साजरे ...

आज जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

आज जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये ...