सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (17:53 IST)

ट्रेनमध्ये महिलांची हाणामारी

mumbai local train
नवी मुंबई नंतर आता विरार दादर लोकलमध्ये महिलांमध्ये झालेल्या हाणमारीचे समोर आले आहे. 15 डब्ब्याच्या विरार दादर फास्ट लोकलमध्ये एक मेकांसोबत हाणमारी करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार वसई स्टेशनवर काही महिला ट्रेनमध्ये चढल्या. या महिला यात्रेकरूंचा आरोप आहे की ट्रेनमध्ये आधीपासून असलेल्या काही महिला प्रवाशांनी दाराला ब्लॉक करून ठेवले होते, या मुळे त्यांच्या आधी बाचाबाची झाली नंतर नोबत मारपीटपर्यंत पोहोचली. प्रवाशांमध्ये असे चकमकी नेहमीच होतात.

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी लोकलमधील दरवाजे अडवणाऱ्या विरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर दरवाजे अडवणाऱ्या प्रकरणावर सुरक्षा यंत्रणा यशस्वी ठरली होती. आता हे प्रकार पुन्हा होत असल्याने मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि खारकोपर मार्गावरील दरवाजे अडकवून ठेवणाऱ्या प्रवाशांवर पुन्हा कारवाई करण्याची गरज भासलेली आहे.

Edited by : Smita Joshi