1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (13:32 IST)

कोचिंग शिक्षक 13 वर्षाच्या मुलीसोबत करत होता घाणेरड काम, संतप्त लोकांनी मारहाण करत काढली धिंड

pitai
कोचिंग क्लासमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईमधील विरारमधून समोर आली आहे. तसेच संतप्त लोकांनी प्रथम आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याची धिंड काढली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. संतप्त लोकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी शिक्षक प्रमोद मौर्य गंभीर जखमी झाला आहे. तर लोकांनी त्याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
प्रमोद मौर्य हा सह्याद्री नगर, मनवेल पाडा, विरार पूर्व येथे खाजगी कोचिंग क्लास चालवतो. यामध्ये सातवीत शिकणाऱ्या 13वर्षीय मुलीचा गेल्या आठवड्यात शिक्षकाने लैंगिक छळ केला, त्यामुळे भीतीपोटी ती दोन दिवस वर्गात गेली नाही. कोचिंग क्लासला न गेल्याने मुलीच्या पालकांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तसेच यानंतर परिसरातील पालक व संतप्त लोकांनी वर्गात जाऊन शिक्षक प्रमोद मौर्य याला बेदम मारहाण केली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने यापूर्वी देखील 3-4 मुलींचा लैंगिक छळ केल्याचे सांगितले जात आहे पण इतर मुली घाबरल्या आहेत. या घटनेची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.  
 
तसेच याप्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, लोकांनी आरोपीला आमच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik