रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (12:28 IST)

धोकादायक ! राज्यात ओमिक्रॉनचे संकट , राज्यात सर्वाधिक रुग्ण ओमिक्रॉनचे

सध्या जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरियंटBओमिक्रॉन आपले पाय पसरत आहे. भारतात देखील कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनची प्रकरणे आढळून येत आहे. राज्यात देखील ओमिक्रॉन व्हेरियंटची रुग्ण आढळून आली आहेत. कोरोनाच्या या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता मुंबईत 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागू केली आहे.  पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच दुकाने, आस्थापन, आणि सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. 
कार्यक्रमात 50 टक्के लोकांची उपस्थिती करण्यात आली आहे.31 डिसेंबरच्या पार्टी साठी 100 भरारी पथक नेमले आहे. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर तसेच ख्रिसमसच्या पार्ट्यांवर पालिकेचे लक्ष असणार आहे. मॉल, दुकानात पूर्ण लसीकरण झालेल्यानाच प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहे. मास्क न लावल्यास. गर्दी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे ही सांगण्यात आले आहे .