बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (09:43 IST)

तरुणाने मारल्या सापाच्या दोरी उड्या ,व्हिडीओ व्हायरल

काही लोक प्रसिद्धी मिळविण्यासाठी काहीही करतात. कधी कधी ते असे काही करतात जे त्यांच्या साठी जीवघेणे ठरते. असेच काही केले आहे पालघरच्या एका तरुणाने .या तरुणाचा हातात साप घेऊन त्याच्या दोरी उड्या केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या अशा क्रूर कृत्यावर सर्प मित्रांनी संताप व्यक्त केला आहे. असं करणं प्राणघातक ठरू शकतं .म्हणून हे स्टंट बघून कोणीही असं करू नये .हे कायद्याने गुन्हा असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले.