बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 9 मार्च 2024 (12:18 IST)

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान आणि ब्रिटनहून कॉल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. क्रांतीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे.
 
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे एनसीबी मुंबई झोनचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नीने सांगितले.
 
क्रांती रेडकरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला पाकिस्तान आणि ब्रिटनमधून वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन येत आहेत. गेल्या एक वर्षापासून हा प्रकार सुरू असून पोलिसांना याबाबत सातत्याने माहिती देण्यात येत असल्याचेही क्रांती यांनी सांगितले.
 
क्रांती सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता क्रांतीच्या या पोस्टवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.