मंगळवार, 26 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (10:51 IST)

इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज होत असताना त्यात स्फोट, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

electric scooter
पर्यावरणासाठी बनवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका स्कूटरच्या बॅटरीमध्ये स्फोट झाला. त्यामुळे एका 7 वर्षाच्या मुलचा मृत्यू झाला. ही घटना मुंबईतील वसई परिसरात घडली. स्फोटामुळे बालक गंभीररित्या भाजला. मात्र, स्कूटरमधील स्फोटाची ही घटना 23सप्टेंबरच्या रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 मीडिया रिपोर्ट्सनुसार, सब्बीर अन्सारी आपल्या आजीसोबत राम दास नगरमध्ये असलेल्या घरात हॉलमध्ये झोपला होता. अंसारीच्या वडिलांनी झोपण्यापूर्वी इलेक्ट्रिक स्टोव्हर चार्जिंगसाठी लावला होता. मात्र पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक स्फोटाचा आवाज आला, त्यामुळे मुलाचे पालक जागे झाले.
 
 स्फोटामुळे शेजारीच झोपलेला अन्सारी भाजला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवसांच्या उपचारानंतर अखेर मुलाचा मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात आजीला किरकोळ दुखापत झाली आहे. स्कूटरची बॅटरी कधी चार्ज झाली हे स्पष्ट झालेले नाही. तो पहाटे अडीच वाजता चार्जिंगसाठी बसवण्यात आल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा दावा आहे. याआधीही काही ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
 Edited by : Smita Joshi