Daily Horoscope
✕

शत जन्म घेऊनही शरद पवारांना समजणे फडणवीसांना शक्य नाही, संजय राऊतांची टीका

Updated: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (17:44 IST)

ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात काय चालले आहे ते देवेबद्र फडणवीसांना शंभर वर्षात देखील समजू शकणार नाही, अशी टीका नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली .

पत्रकारांशी बोलताना शिवसेना (UBT) नेते म्हणाले, शरद पवार काय विचार आणि नियोजन करत होते हे फडणवीसांना 2019 मध्ये माहीत होते का? त्यांनी शंभर वेळा जन्म घेतला तरी शरद पवारांच्या मनात काय चालले असेल याची कल्पनाही करता येत नाही. राज्य सरकारमध्ये थोडी हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीची तारीख जाहीर करावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केवळ राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमध्येच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातही फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

अजित पवारांनी नुकतेच वक्तव्य केले की, कुटुंबात तढी निर्माण करणे समाजाला आवडत नाही त्यावर संजय राऊतांनी म्हटले,  महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि घराणे कोणी तोडले? मोदी आणि शहा यांनी राजकीय पक्ष आणि कुटुंबांमध्ये फूट निर्माण केली. यात एकनाथ शिंदे व अजित पवार बळी ठरले. त्यांना पक्ष सोडण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या, दबाव आणला गेला किंवा आमिष दाखवले गेले हे त्यांनी मान्य करावे.अशी घणाघात टीका संजय राऊतांनी केली.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ई-केवायसीच्या अडथळ्यामुळे १४,९७६ शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

LIVE: मुंबईकरांसाठी बीएमसीची नवी डिजिटल सुविधा! ‘हॅलो ए वॉर्ड’ एआय चॅटबॉट सुरू

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

दिल्लीतील आंदोलकांच्या अटकेमुळे सोनम वांगचुक संतप्त, उपोषण आणि पायी मोर्चाचा इशारा

तुम्ही हवे तितके पोलीस बोलवा, आम्ही मागे हटणार नाही..." - राहुल गांधींचा मोदी सरकारवर मोठा हल्ला

पुढील लेख
Show comments