गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (16:53 IST)

ठाण्यात सहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

arrest
बदलापूर घटनेनन्तर महाराष्ट्र हादरले असून अद्याप महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज महिला आणि मुलींचे विनयभंग केल्याचे प्रकरण समोर येत आहे. सरकारने या प्रकरणात तातडीचे पाऊल घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे एका सहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 

सदर घटना ठाण्यातील अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 6 वर्षाची पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहत असून शनिवारी मुलगी घरी एकटी जातांना पाहून 23 वर्षीय तरुणाने तिला सोबत नेण्याचा प्रयत्न केला.

मुलगी रडू लागल्यावर स्थनिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी तरुणाला चांगलाच चोप दिला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आल्यावर आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर मुलीच्या विनयभंगासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  
Edited By - Priya Dixit