गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (13:19 IST)

Pune: पुण्यात पीएमपी बसमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्याला अटक

arrest
पुण्यात पीएमपी बस मधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोला पोलिसांनी चांगलीच अद्दल शिकवली असून त्याला अटक केली.प्रभात कुमार तिवारी असे या आरोपीचे नाव असून हा चाकणला राहतो. 

सदर प्रकरण भोसरी ते पुणे स्टेशनचे आहे. पीएमपीच्या बस मध्ये एक तरुणी आपल्या मैत्रिणींसह भोसरी ते पुणे स्टेशन जाण्यासाठी बसली. आरोपी या तरुणीच्या मागे उभे राहून तिच्याशी अंगलट करत होता. तिने अनेकदा त्याला समजूत दिल्यावर देखील तिला मुद्दाम स्पर्श करत होता. ही तरुणी पुणे स्टेशनवर उतरल्यावर देखील तो तिचा पाठलाग करत होता. 

तरुणीने अखेर त्याला धडा शिकवायचे ठरवले आणि ती थेट बंडगार्डन पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीची तक्रार केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली पोलिसांनी त्या रोड रोमियोला अद्दल शिकवली आणि अटक केली.  
 
 Edited by - Priya Dixit