1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (13:52 IST)

असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज! पूर्ण माहिती

sarathi socolership
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( SARTHI PUNE ) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी व अकरावी च्या मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय आहे? कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत? अर्ज कसा व कुठे करावा लागेल? या विषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.
 
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 9 वी, इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वी च्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे कडून मागविण्यात येतात.   SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील इयत्ता नववी ते अकरावी तील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमहा 800 रुपये प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता 9 वी, 10 वी व 11 वी मध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचा पात्र असणाऱ्या मराठा व कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या इयत्ता ९ वी, १० वी व 11वी तील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना असतो.
 
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीद्वारे इयत्ता 9 वी, इयत्ता 10 वी इयत्ता 11 वी तील मराठा व कुणबी समाजातील पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा 800 रुपये म्हणजेच एका शैक्षणिक वर्षात 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या होतकरू किंवा हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 
Chhatrapati Rajaram Maharaj sarthi scholarship eligibility: छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत.
 
    Sarthi Scholarship 2023-24 चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता 9 वी, इयत्ता 10 वी व इयत्ता 11 वी या वर्गात शिक्षण घेत असावा.
    या शिष्यवृत्तीचा लाभमराठा, कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी–मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.
 
 राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र आहेत.
  NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र असलेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मात्र समजण्यात येईल.
 इयत्ता 10 वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 वी मध्ये 55% टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी मध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 3,50,000/- पेक्षा कमी असावे.  इयत्ता 10 वी व 11 वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1,50,000/- पेक्षा कमी असावे.
 
खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती साठी अपात्र आहेत.
 
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.
सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
 
आवश्यक कागदपत्रे-
छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती साठी आवेदन करताना विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.                                                                                        
विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज. इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
मुख्याध्यापकांचे / प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.              
विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्य प्रत.
विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुक च्या पहिल्या पानाची सत्य प्रत ( नाव, खाते क्रमांक, IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
 इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 वी च्या वार्षिक परीक्षेत 55% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
 इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी च्या वार्षिक परीक्षेत 60% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
 NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक/ निकाल पत्रक.
 अन्य् अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही.
 
शाळा स्तरावर अर्ज भरून कागदपत्रांसह गट शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करणे व ऑनलाइन लिंक वर माहिती भरता येते.
 
गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेले अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अर्ज मा. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, Sarthi Pune महाराष्ट्र 411004 या पत्त्यावर सादर करावे.

Edited By - Ratnadeep ranshoor