सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (17:38 IST)

लुडो खेळावरून लोकल मध्ये हाणामारी

खेळामध्ये मुलांमध्ये वादावादी होणं हे सहज आहे. पण मोठ्यांमध्ये खेळावरून वादावादी नंतर हाणामारी होणं हे धक्क्कादायक आहे. लुडो खेळावरून लोकल मध्ये दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना भाईंदर लोकल मध्ये घडली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारी करणारे हे दोघे प्रवासी दररोज प्रवास करणारे असल्याची माहिती मिळाली आहे. 

भाईंदर ते चर्चगेट पर्यंत जाणाऱ्या लोकल मध्ये हाणामारीचा हा प्रकार सकाळी 11:30 ला घडला आहे. सकाळी भाईंदर वरून चर्चगेट लोकल सुटल्यावर या दोन्ही प्रवासांमध्ये मीरारोड ते दहिसर दरम्यान लुडो खेळण्यावरून वाद झाला नंतर त्यांच्यामध्ये हाणामारी होऊ लागली . लोकल मधील काही प्रवाशांनी या हाणामारीचे चित्रण आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दहिसर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले आहे.