बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:49 IST)

मुबंई : मानखुर्दमध्ये गोडाऊनला लागली भीषण आग

मुंबई- मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळे स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची तीव्रता भीषण आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
 
या दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. या गोदामात तेल आणि भंगाराची दुकानं असल्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आहे.