शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: कल्याण , सोमवार, 9 मे 2022 (21:20 IST)

पाच जणांचा मृत्यू त्यानंतरही कपडे धुण्यासाठी खदाणीवर

dombevali mahapalika
संदपगाव नजीक खाणीत बुडून एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता तीन दिवस झाले तरी परिस्थिती बदलली नाही. डोंबिवली देसले पाडामधील परिस्थिती बदलली नाही. खदाणीवर कपडे धुण्याचे काम अजूनही थांबले नाहीच. नागरिक कल्याण डोंबिवली महापालिकेला कर भरुनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत.
 
डोंबिवलीत पाण्याच्या टंचाईने एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसा पूर्वी घडली. मात्र या गावची परिस्थिती बदलली ना खदाणीवर कपडे धुण्याचे थांबले. ज्या खदाणीत पाच जणांचा मृत्यू झाला त्या खदाणीच्या काठावर बसून आजही महिला आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन कपडे धुत आहे. देसले पाडा परिसरात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांना दररोज दोनशे ते पाचशे रुपये खर्च करून पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. जे नागरीक विकत पाणी घेऊ शकत नाही ते खदाणीचा आधार घेतात.