शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: भिवंडी , सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (18:51 IST)

मुंबईच्या भिवंडित 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार

मुंबईच्या भिवंडित 16 वर्षीय अल्पवयीन अपंग असलेल्या मुलीवर बलात्काराची एक घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर 48 वर्षीय काकाने बलात्कार केला आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने अत्याचार केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी काकाला बेड्या ठोकल्या आहेत.