1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (15:43 IST)

हे प्रश्न बऱ्याचदा अरेंज्ड मॅरेज साठी मुलींना विचारले जातात

असे म्हटले जाते की 'फर्स्ट इंप्रेशन इज़ लास्ट इंप्रेशन 'असते.प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी पहिल्यांदाच स्वतःसाठी जोडीदार निवडताना असेच काहीसे घडते.ज्या पद्धतीने तुम्ही लग्नाच्या आधी पहिल्या भेटीत वागता ते समोरच्या व्यक्तीच्या मनात  तुमची प्रतिमा तयार करते.लग्नासाठी जोडीदार शोधतानाअनेक प्रकारचे प्रश्न अनेकदा जोडप्यांच्या मनात येतात.चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे ते प्रश्न जे बहुतेक मुले त्यांच्या भावी जोडीदाराला अरेंज्ड मॅरेज करण्यापूर्वी विचारतात.
 
1 लग्नानंतर नोकरी करणार किंवा नाही - अरेन्ज्ड मॅरेज करणारे मुल मुलीला पसंत करण्यापूर्वी हा प्रश्न अनेकदा विचारतात.काही मुली त्यांच्या पालकांच्या दबावाखाली येतात आणि म्हणतात की ते लग्नानंतर नोकरी सोडतील. पण त्यानंतर, आयुष्यभर तिला वाईट वाटत राहते की ती स्वतःसाठी काहीच करू शकली नाही. ती स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही.म्हणूनच, जर एखाद्या मुलाने तुम्हाला हा प्रश्न विचारला तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्या स्वप्नांशी तडजोड करून नाही तर काळजीपूर्वक विचार करून द्या.
 
2 तुम्ही व्हर्जिन आहात का? - अरेंज्ड मॅरेजमध्ये लग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे मानले जाते.अरेंज्ड मॅरेज करणार्‍या पुरुषाला त्याची बायको व्हर्जिन असावी असे वाटते.हा प्रश्न अनेकदा मुलगा मुलीलाही विचारतो असे दिसून येते. या प्रश्नाचे उत्तर नाही असले तरी मुलगी हो म्हणून उत्तर देते.सं करणे चुकीचे आहे.लग्नापूर्वी लैंगिक जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलण्याची मुलीला पूर्णपणे मुभा असावी.
 
3 कुटुंब नियोजनाचे काय? मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी लग्नापूर्वी हा प्रश्न विचारल्याचे अनेकदा दिसून येते.उशीरा बाळ करण्याचे काही नियोजन तर नाही.असे प्रश्न स्वतःमध्ये खूप चुकीचे आहेत.लग्नाआधी, कोणतेही जोडपे सांगू शकत नाहीत की त्यांचा भावी जोडीदार कसा असेल किंवा त्याच्या बरोबर त्यांचे भविष्य काय असेल.
 
4 लग्नापूर्वी वजन कमी करावं लागेल - जर मुलगी थोडी लठ्ठ किंवा सडपातळ असेल आणि मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना ते आवडले असेल, तर अनेक वेळा मुले मुलीला प्रश्न देखील विचारतात की ती लग्नापूर्वी ती तिचे काही वजन वाढवेल की कमी करेल? असे प्रश्न मुलीचा आत्मविश्वास कमी करू शकतात.अशा प्रसंगी मुलीने प्रश्नाचे उत्तर देताना तिच्या मनाचे ऐकावे.
 
या गोष्टी लक्षात ठेवा- पहिल्या बैठकीत मुलीशी बोलताना मुलांनी तिचे जुने नाते किंवा खूप अवघड प्रश्न विचारणे टाळावे.या बैठकीत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आवडी निवडीबद्दल बोलू शकता.हे आपल्याला एक कल्पना देईल की आपण त्यांच्या घरात त्यांच्याशी जुळवून घेऊ शकाल की नाही.
 
लग्नाचा विषय येताच लोक त्यांच्या भविष्याचा आणि बचतीचा विचार करू लागतात.पण मुलीला तिच्या पगाराबद्दल थेट विचारू नका.याचा अर्थ, मुलीशी पहिल्याच भेटीत पैशाबद्दल बोलू नका.आपण आधी एकमेकांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव समजून घ्या. हे आपल्यासाठी चांगले असेल.