मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (15:42 IST)

कॉलेजमधील मुली यांच्या रॅगिंगमुळे शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या ?

नाशिकच्या वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये  शिकत असलेल्या स्वप्नील शिंदे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. मुलाच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचाआरोप केला आहे.कॉलेजमधील मुली त्याची नेहमी रॅगिंग करत असत या त्रासाला कंटाळून स्वप्नील ने याअगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न  केला होता. कॉलेजमधील त्रास थांबत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केलीय. मात्र कॉलेज प्रशासनने आत्महत्या नसून तो चक्कर येऊन पडला असल्याचं म्हटलंय. दरम्यान त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणला आहे. 
 
 नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदेअसे या डॉक्टरचे नाव असून तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत होता. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणाऱ्यांची नावे ही दिलीअसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
 
सुत्रांच्या माहितीनुसार कॉलेजमधील काही मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या.त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे.स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणाऱ्यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. 
 
स्वप्नील महारु शिंदे मेडिकल कॉलेज येथील ऑपरेशन थिएटरच्या बाजूस असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.त्यावर उपचार सुरू होते.स्वप्नील यास रात्री सुमारे १०.३० चे सुमारास डॉ. जितेंद्र खोडीलकर यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.