शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:17 IST)

नालासोपाऱ्यात 4 मजली रहिवासी इमारत कोसळली

नालासोपाऱ्यात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास १० वर्ष जुनी ४ मजली इमारत कोसळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
 
वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
 
नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. आधी इमारतीचा काही भाग कोसळला आणि त्या आवाजाने लक्ष वेधल्यावर सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाले. खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. मात्र अवघ्या काही वेळात संपूर्ण इमारत कोसळली. इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवित झाली नाही. नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. 
 
ही इमारत पालिका प्रशासनाकडून यापूर्वीच धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यामुळे काही रहिवाशी यापूर्वीच इमारत सोडून गेले होते. मात्र 5 कुटुंब येथेच राहत होते. परंतू घटनेची चाहुळ लागताच रात्री ते सुरक्षित बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला.