मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (09:48 IST)

मुंबईत भरधाव कारने धुमाकूळ घातला, 4 जणांचा मृत्यू

मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरातील एका सुसाट कारने 8 जणांना चिरडलं आहे. यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जखमी झाले आहेत. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास ही घटना जनता हॉटेलच्या जवळ घडली. जनता हॉटेलच्या समोरील रसत्यावरुन वेगात आलेल्या गाडीने हॉटेलसमोर उभे 8 जणांना चिरडलं. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला तर 4 जखमींवर उपचार सुरु आहेत.
 
घटना घडल्यानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.