बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (16:39 IST)

मुंबईची ऐतिहासिक ओळख असलेली डबल डेकर भंगार जमा

मुंबईची ऐतिहासिक ओळख दाखवून देणाऱ्या डबल डेकर बसेस आता भंगारात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भंगारात देण्यात येणाऱ्या डबल डेकर्सला 15 वर्ष पूर्ण झाली असून 2005 मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. परंतु नागरिक, ट्रेड युनियनचे मेंबर्स आणि एक्सपर्ट्स यांनी म्हटले आहे की, बस चांगल्या स्थितीत असल्या तर त्या अशा परिस्थितीत पुढे वापरण्यास योग्य ठरतील. यापूर्वीच्या रिपोर्टमध्येही बेस्टकडून जवळजवळ 900 बेस्ट भंगारात देण्यात येणार असून त्यापैकी 60 डबल डेकर बसेस शहरात असल्याचं म्हटलं होत.
 
बेस्ट अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, 2005-06 वर्षातील काही बसेस असून त्यांना 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता त्या नागरिकांच्या सुविधेसाठी वापरल्या जाऊ नयेत. या डबल डेकर भंगारात दिल्यानंतर यांची जागा मिनी बसेस घेतील परंतु त्यांची किती संख्या असेल याबबद्दल अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांच्या मते, बेस्ट जुन्या डबल डेकर भंगारात देऊन नव्या घेणार असल्याचा प्रस्ताव आहे. परंतु यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.