सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (11:38 IST)

समुद्राचं पाणी गोड होणार, 2025 पासून मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा

मुंबई- शहरासाठी वॉटर डी-सेलीनेशन प्लांट बसविण्याच्या योजनेने आणखी एक पाऊल पुढे टाकत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी BMC ने इस्राईलमधील जल तंत्रज्ञान कंपनीशी करारावर स्वाक्षरी केली आहे.
 
मालाड मनोरी येथे प्रस्तावित असलेल्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल तयार करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थीतीत हा करार झाला. धरणांसाठी पर्याय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात असून 2025 पासून या प्रकल्पातून मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा सुरु होईल असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
 
मुंबईचा पाणीपुरवठा वाढविण्यासाठी बीएमसी मालाड मनोरी येथे राज्याचा पहिला डिझिलेशन प्लांट स्थापित करेल. या प्रकल्पासाठी 1,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 
 
मुख्यमंत्री म्हणाले की 200 मिलियन लिटर डिझलिनेशन प्रकल्प हे क्रांतीकारी पाऊल आहे आणि आवश्‍यकतेनुसार हा प्रकल्प 400 दशलक्ष लिटर पर्यंत वाढविण्यात येणार आहे. हे त्याचं कित्येक वर्षांचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे ही आपली जबाबदारी आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. 
 
या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महानगर पालिकेने इस्त्राईलच्या आय.डी.ई वॉटर टेक्नोलॉजी या कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनी 200 दशलक्ष लिटर पाणी निर्माण करण्याच्या प्रकल्पाचा अहवाल तयार करणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे राज्याच्या किनारपट्टीवर अशी आणखी प्रकल्पे उभारली जाऊ शकतात.