यंदाही गरबा, दांडियावर बंदी; नवरात्रोत्सवासाठी मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी,नियमभंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

Last Modified सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:55 IST)
नवरात्रोत्सवासाठी मुंबई महापालिकेने गुरुवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. गतवर्षांप्रमाणे यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत.

पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पालिकेच्या सर्व मार्गदर्शक सूचना व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्व साहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
करोनाचे सर्व नियम पाळून सण साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही प्रसाद वाटप, जाहिराती यांवरही बंदी घालण्यात आली आहे. यासह अन्यही सूचना करण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोर पालन करणे नागरिकांना बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
नागरिकांच्या सहभागावर मर्यादा
देवीचे आगमन आणि विसर्जनासाठी, तसेच मंडपात किती नागरिकांनी सहभागी व्हावे याबाबतही मर्यादा घालण्यात आली आहे. घरगुती मूर्तीच्या आगमन, विसर्जनासाठी पाच व्यक्ती तर सार्वजनिक मंडळासाठी १० जणांना उपस्थित राहता येणार आहे.
या व्यक्तींनी करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात, तसेच दुसरी मात्रा घेऊन १५ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. नवरात्रोत्सवात कोणत्याही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना गरब्याचा फेर धरता येणार नाही. दांडिया, भोंडलाही रंगणार नाही.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या ...

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्या चांदीचे नवे दर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात घसरण झाली. आज सलग ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही ...

ICC Women World Cup 2022:6 मॅचमध्ये शानदार बॅटिंग करूनही पूनम राऊतला टीम इंडियात जागा मिळाली नाही
बीसीसीआयने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक 2022 साठी टीम इंडियाची घोषणा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा ...

वडिलांनी 16 महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला
आपल्या 16 महिन्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन प्रवास करणाऱ्या एका जोडप्याला सोलापूर, ...

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम ...

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते

फेक पेटीएम अॅपपासून सावध राहा,आपली फसगत होऊ शकते
आजच्या युगात जवळपास सर्वच कामे ऑनलाइन झाली आहेत. खरेदी असो किंवा पैशांचे व्यवहार असो, ...