शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (14:26 IST)

परळ परिसरात महानगर गॅस गळतीमुळे गॅसच्या पाइपलाइनला आग

मुंबईच्या परळ परिसरात महानगर गॅस लिमिटेडच्या पाइपलाइनला गॅस गळतीमुळे आग लागली. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब  घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या परिसरात गॅस गळती अद्याप सुरु आहे. मोठी घटना होऊ नये आणि खबरदारी म्हणून परिसरातील सर्व दुकाने  बंद करण्यात आली. हे परिसर पेट्रोल पंपाजवळ आहे. गॅस गळती बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे. 
माहितीनुसार, हिंदमाता येथील पेट्रोल पँपासमोर महानगर गॅस लिमिटेडची गॅस पाईपलाईन अंडरग्राउंड आहे. या भागातून अचानक आगीच्या ज्वाळा  उठू लागल्या. पाईपलाईन मधून उठणाऱ्या या आगीच्या ज्वाळा पाहून परिसरातिल नागरिक हादरले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब हजर झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. गॅस पाईपलाईन मध्ये गॅसचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पोलीस देखील घटनास्थळी हजर आहे. खबरदारी म्हणून परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहे. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.