शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (09:33 IST)

घरातील नोकराने चोरले सोने आणि डायमंड दागिने, मुंबई पोलिसांनी युपी मधून घेतले ताब्यात

मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीच्या घरातून दोन कोटी पेक्षा जास्त चोरी करणाऱ्या नोकराला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीसोबत अन्य इतर दोन जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्याजवळून दागिने आणि पैसे जप्त करण्यात आले आहे. आरोपींची चौकशी सुरु आहे. 
 
एका व्यक्तीच्या घरातून सोने, डायमंड, पैसे हे चोरी झाले होते. या वस्तूंची किंमत दोन कोटींपेक्षा जास्त आहे. याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. सीसीटीव्ही आणि टेक्निकल टीमच्या मदतीने पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींजवळ पैसे, दागिने मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मध्ये राहणार हा व्यक्ती आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गोवा येथे गेला होता. घरी आल्यानंतर त्याने आलमारी चेक केली त्यामध्ये सामान नव्हता. चोरी झाल्याचे समजताच त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर नंतर समजले की, घरातच काम करणाऱ्या नोकरानेच हे काम केले आहे. पोलिसांनी या आरोपीना उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेतले. 

Edited By- Dhanashri Naik