1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (11:38 IST)

Govandi : गोवंडीत सैराटची पुनरावृत्ती, प्रेम विवाहामुळे लेकी जावयाची हत्या

murder
मुंबईच्या गोवंडीत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. मुलीने प्रेम विवाह केल्यामुळे संतापून कुटुंबीयांनीच जावयाला घरी बोलावून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या केली नंतर मुलीचा देखील गळा आवळून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
करण चन्द्र आणि गुलनाझ खान यांची हत्या करण्यात आली. करणं हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून गुलनाझ गोवंडी भागात राहायची.करण देखील तिथेच राहायचा. दोघांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेम प्रकरण वाढले. त्यांनी नोव्हेंबर मध्ये घरातून पळून जाऊन लग्न केलं त्यांच्या आंतरधर्मीय लग्नाला मुलीच्या घरातील लोकांचा विरोध होता. मुलीच्या कुटुंबीयांनी राग धरून त्यांची हत्या करण्याची योजना आखली. त्यांनी लेकीला आणि जावयाला घरी बोलावलं आणि आधी जावयाची गळा चिरून हत्या केली . नंतर मुलींचाही गळा दाबून खून केला. नंतर त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. 

पोलिसांनी या प्रकरणी मुलीचे वडील, भाऊ त्याचा मित्र आणि तीन अजून अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. पोलिसांना आधी करण चा मृतदेह आढळला नंतर तपास केल्यावर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी मुलीच्या वडिलांची चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हाकेल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींना लेकीआणि जावयाची हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.  
 
 
Edited by - Priya Dixit