Hatman killer मुंबईत हॅटमॅन किलर?
Twitter
काय आहे संपूर्ण प्रकरण?
व्हायरल व्हिडिओ @1Munendrasingh यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या पोस्टसह त्यांनी लिहिले की, मुंबईतील धक्कादायक घटना! #HatmanKillerInMumbai ने एका महिलेवर चाकूने हल्ला केला, लीक झालेल्या सीसीटीव्ही फुटेजने संपूर्ण घटना रेकॉर्ड केली आहे. संतापलेल्या चोरट्याने तिला रस्त्यावर ओढले. ही घटना का घडली हे स्पष्ट झालेले नाही.. HatMan सावधान. व्हिडिओ शेअर करताना यूजर्सने मुंबईत राहणाऱ्या लोकांना हॅटमॅनपासून दूर राहण्याची विनंती केली आहे. त्याच वेळी, इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ सतत शेअर करत आहेत.
मारल्यानंतर हे केलेBe safe Guys and aware from this type of men , don't live lonely in deserted place #HatmanKillerInMumbai pic.twitter.com/G6cLiwmN3c
— Munendra Singh (@1Munendrasingh) November 11, 2022
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक महिला कारमधून खाली उतरते, तेव्हाच एका अज्ञात व्यक्तीने महिलेवर मागून हल्ला केला. व्हिडिओ पाहून तो महिलेवर चाकूने हल्ला करत असल्याचे दिसत आहे. हल्ल्यानंतर लगेचच महिला रस्त्यावर खाली पडते. यानंतर हल्लेखोर महिलेला रस्त्याच्या कडेला ढकलून देतो. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती ही घटना अंधेरीची असल्याचे सांगत आहे. तरी हा व्हिडिओ कुठे आहे? अद्याप ह्या व्हायरल व्हिडिओला कोणी दुजोरा दिला नाही आहे.
Edited by : Smita Joshi
