शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (08:26 IST)

हनुमानाचं नाव ऐकून रावणच सूडाने पेटला असेल- चित्रा वाघ

chitra wagh
एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकारने.. असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे.
 
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार नवनीत राणा यांची लिलावती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याबरोबरच राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा गुरुवारी अखेर कारागृहाबाहेर पडले. मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. 
 
राणा दाम्पत्याला बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला होता. पण, न्यायालयाच्या आदेशाची प्रत साडेपाच वाजेपर्यंत कारागृहात न पोहोचल्यामुळं त्यांना बुधवारची रात्रही कारागृहात काढावी लागली. नवनीत यांना भायखळा कारागृहात, तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे.