1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Heavy rains in Mumbai led to waterlogging in several areas

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले, अंधेरी मेट्रो बंद , अनेक भागांत यलो ऑरेंज अलर्ट जारी

मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने झोडपले असून सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. लोकल ट्रेन्स सुरु आहे. हवामान विभागाने ठाणे, पालघर, अंधेरी, रायगड आणि मुंबईच्या अनेक भागांत पावसाचा यलो, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
मुंबईत पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावर तलाव झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. 
 
लोकांना घराबाहेर पडताना अडचणी येत आहेत. अंधेरी सबवे, मालाड, जोगेश्वरी, कुर्ला, मुलुंड आणि कांजूरमार्ग यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बीएमसीने लोकांनां पाणी साचलेल्या भागांत जाण्याचा सल्ला दिला आहे.  
दरम्यान, अंधेरी भुयारी मार्गात पुन्हा एकदा इतके पाणी साचले की, आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.  अंधेरी भुयारी मार्ग हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे. दररोज हजारो वाहने आणि लोक या मार्गावरून ये-जा करतात, परंतु पावसाळ्यात अंधेरी भुयारी मार्गात इतके पाणी साचते की तो बंद करावा लागतो.   
 
हवामान विभागाने बुधवारी महाराष्ट्राच्या अधिकांश मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे  आकाश ढगाळ असून काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या मते, ही हवामान परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.  
मुंबईसाठी 1 जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी 40-50 किमी वेगाच्या वाऱ्याची शक्यता आहे. 
 5 ते 6 जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
Edited By - Priya Dixit  
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: महायुतीच्या पाठिंब्याने सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले