1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2023 (08:05 IST)

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत

eknath shinde
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 8 हजारांहून अधिक रुग्णांना 60 कोटी 48 लाखांची मदत
मुंबई, मे– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या 10 महिन्यांत  8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे.
 
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1237 रुग्णांना 10 कोटी 27 लाख, मार्च 2023 मध्ये 1469 रुग्णांना 11 कोटी 95 लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी 1984 रुग्णांना 9 कोटी 93 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
 Edited by : Ratnadeep Ranshoor