मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (21:22 IST)

मुंबई पोलीस आयुक्तपदावर हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली.

Hemant Nagrale has been appointed as the Commissioner of Mumbai Police.
आयपीएस परमबीर सिंग यांनी पदभार स्वीकारल्याच्या जवळपास एक वर्षा नंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून काढण्यात आले आहे. आता सिंग यांच्या जागी हेमंत नागराळे पदभार स्वीकारतील. 
1998 या बॅचचे आयपीएस परमबीर सिंग यांना 29 फरवरी 2020 रोजी आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांच्या जागी हे पदभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता होम गार्ड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.त्यांच्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्तांचे पद हेमंत नागराळे यांना देण्यात आले आहे.   
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका रहिवाशी ठिकाण्यावरून स्फोटकांनी भरलेल्या वाहने ठेवण्याच्या कारणावरून मुंबई पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून सिंग यांना या पदावरून काढण्यात आले आहे. वाझे यांना 25 मार्च पर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणे(एनआईए)च्या कोठडीत पाठविण्यात आले आहे. 
परमबीर सिंग नुकतेच टीआरपी घोटाळा उघडकीस करणाच्या प्रकरणात चर्चेत आले होते. परमबीर सिंग या पूर्वी अँटी करप्शन ब्युरो मध्ये डीजी म्हणून तैनात होते. या शिवाय त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून     
देखील कारभार सांभाळले आहे . 
हेमंत नगराळे सध्या महाराष्ट्राचे पोलीस डीजी म्हणून तैनात होते त्यांची नियुक्ती मुंबई पोलिसांचे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.