'त्या' सोसायटीमधले डीव्हीआर जप्त
सचिन वाझे यांचं घर असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीमधील दोन डीव्हीआर मनसुख हिरेन यांचा मृत्यू होण्याच्या आधी जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मृतदेह मुंब्र्याच्या खाडीमध्ये सापडला. मात्र, साकेत सोसायटीमधले डीव्हीआर २७ फेब्रुवारीला जप्त करण्यात आले आहेत. याबाबतचे पत्रव्यवहार समोर आले आहेत.
वाझेंनी तपासादरम्यान अनेक महत्वाचे पुरावे नष्ट केल्याची शक्यता तपास यंत्रणा करत आहेत. दरम्यान, मोठा खुलासे समोर येत आहेत. सचिन वाझेंनी त्यांच्या सोसायटीतील डिव्हीआर २७ फेब्रुवारीलाच काढला होता. २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. पण २७ फेब्रुवारीला सचिन वाझेंनी साकेत कॉम्प्लेक्स या त्यांच्या सोसायटीशी विशेष पत्रव्यवहार करून डीव्हीआर काढला. वाझेंनी हा डीव्हीआर नष्ट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेच्या आधी गाडी चोरीला गेली नसून ती वाझे यांच्याच ताब्यात होती असा संशय आता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.