1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (21:59 IST)

पंत प्रधान मोदी म्हणाले- माझ्या आईला कोरोना लस देण्यात आली

PM TWEET  PM MODI MOTHER HAS TAKEN FIRST DOSE OF CORONA VACCINE MARATHI NEWS IN WEBDUNIA MARATHI CORONAVIRUS NEWS
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिरा बा यांनी गुरुवारी कोविड विरोधी लस घेतली .स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती सामायिक केली आणि लसीसाठी पात्र असलेल्यांना सर्वांनी लसीकरण करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.  
 
त्यांनी ट्विट केले की ही माहिती सामायिक केल्याने मला आनंद झाला आहे. माझ्या आईने गुरुवारी कोविड -19 लसचा पहिला डोज घेतला. मी सर्वांना आग्रह करतो की त्यांनी सर्व पात्र लोकांना लसीकरणासाठी प्रेरित करावे आणि त्यांचे सहकार्य करावे. पंतप्रधानांची आई हिरा बा गुजरातमध्ये राहतात.