इक्बाल चहल मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली असून आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून UDD चे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जरड यांनाही हटवण्यात आलं आहे. त्यांच्याजागी संजीव जैस्वाल यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यातच प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.