गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (08:20 IST)

मनसे पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत, कोळी महिलांचा प्रश्न सोडवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मदतीसाठी कोळी महिलांनी धाव घेतली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जात या महिलांनी आपल्यापुढं असणाऱ्या अडचणी मांडत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा केली. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्येच मनसे स्टाईलनं या महिलांच्या अडचणी दूर केल्या. 
 
मनसेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबची माहितीही देण्यात आली. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळं आमचा व्यवसाय मंदावल्याचं सांगत आपल्याला त्यांचा त्रास होत आहे. कृपया यात लक्ष द्या, अशी विनंती या महिलांनी केली होती. ज्यानंतर याच गोष्टीची दखल घेत स्थानिक मनसे विभाग अध्यक्ष संजय नाईक यांनी बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्यांना चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळालं. 
 
सदर परिसद #मनसेदणका देण्यापूर्वी कसा होता आणि त्यानंतर आता हा परिसर नेमका कसा आहे, याबाबतची छायाचित्रही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली.