शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (09:02 IST)

'हे' वृत्त पूर्णपणे चुकीचं आणि खोडसाळपणाचे, मनसेचा पत्रकातून खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी पाळायचा नियम मोडल्याने त्यांना दंड भरावा लागल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं आणि खोडसाळपणे दिल्याचं मनसेनं म्हटलं आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मनसे अधिकृत या पक्षाच्या ट्विटर हँडलवर एक पत्रक काढून असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
मनसेने काय म्हटलं आहे पत्रात?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अलिबाग दौऱ्या दरम्यान चुकीची आणि खोडसाळ बातमी देण्यात आली. एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर एका इंग्रजी दैनिकाचा हवाला देऊन प्रसारित करण्यात आली. ज्यात असे म्हटलं होतं की ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मुंबईहून अलिबागला गेले. त्यावेळी त्यांनी रो-रो फेरीने प्रवास केला. राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न घालता उभे होते तसंच यावेळी त्यांनी सिगारेटही ओढली. या सगळ्या प्रकारानंतर बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना दंड ठोठावला. मात्र सदर प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. अशी कोणतीही घटना घडलेली नाही असे मी ठामपणे सांगतो आहे. प्रसारित करण्यात आलेली बातमी पूर्ण चुकीची आणि खोडसाळ आहे. अशा बातम्यांमुळे लोकांची दिशाभूल होते.