बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (12:04 IST)

मुंबईच्या महापौरांना मारण्याची धमकी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आले असून पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणात थोड्याच वेळात महापौर पोलिसांत तक्रार देणार आहे. धमकी सोबतच या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
 
माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगुन अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. लक्षात असेल तर गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे आली होती जीवे मारण्याची धमकी. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुस-यांदा धमकी मिळाली आहे.