मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (15:28 IST)

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत महिलेला धमक्या

the-victim
बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबीयांना त्रास देणार्‍या मोहसीन शेख व इतर दोन महिलांविरोधात कारवाई करण्याचा तक्रार अर्ज मुकुंदनगर येथील पिडीत विधवा महिलेने पोलीस अधीक्षकांना दिला.
पिडीत विधवा महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये साजिद अब्दुललतीफ शेख उर्फ लाला याच्या विरोधात 26 नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा न्यायालयात जबाब देण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी गेले असता, घरी परतताना मोहसीन शेख (रा. अलमगीर) याने चार चाकी गाडी उभी करुन माझी आई व मला पैसे घेऊन गुन्हा मागे घेण्याचे सांगितले.
अन्य तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर बोल्हेगाव येथे कामावर असलेल्या भावाला देखील मारण्यासंबंधी धमकावले आहे.
या प्रकरणात मोहसीन शेख, शाहीन शेख, मड्डो शेख साजिद शेख उर्फ लाला यांच्याकडून कुटुंबीयांना धोका असल्याचे पिडीत महिलेने तक्रार अर्जात म्हंटले आहे.तर गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.