मुंबईत मुलाचा तोल गेल्याने अंगावर पडला त्यात चिमुरडीचा मृत्यू
Mumbai News : महाराष्ट्रातील मुंबई मध्ये जुहू परिसरात एक मुलगा दोन वर्षांच्या मुलीवर तोल गेल्याने पडला व त्यात दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 2 जानेवारी रोजी घडली, जेव्हा ही चिमुरडी तिच्या कुटुंबाच्या दुकानाजवळ खेळत होती. मुलीचे वडील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीनुसार, आरोपी हर्षद गौरव त्यावेळी मित्रांसोबत मस्ती करत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र शाहनवाज अन्सारीही उपस्थित होता. मुलीच्या आईने त्यांना इथे मस्ती करू नका, दुसऱ्या ठिकाणी जा, असा इशारा दिला. पण त्यांनी ऐकले नाही. दोघे मस्ती करत होते. यादरम्यान हर्षदचा तोल गेला आणि तो चिमुरडीवर पडला. कुटुंबीयांनी मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली म्ह्णून तिला तातडीने मुंबईतील रुग्णालयात नेले. जिथे मुलीवर उपचार सुरू होते, पण दोन दिवसांनी मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 अंतर्गत जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.