शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (19:20 IST)

मुंबईत लोकल सेवा सुरु होणार -विजय वडेट्टीवार

मुंबईत लोकल सेवा कधी सुरु होणार या बाबतची माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.ते म्हणाले ,की मुंबईत अनलॉक करण्याचे स्तर निश्चित केले आहे. सध्या मुंबई तिसऱ्या स्तरावर आहे. ज्या क्षणी मुंबई तिसऱ्या स्तरापासून पहिल्या स्तरावर येईल त्याच क्षणी लोकल सेवा सुरु करण्यात येईल.
 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झालेला आहे परंतु अद्याप कोरोना गेलेला नाही.त्यांमुळे त्याचे निर्बंध पाळावेच लागणार.मास्क लावणे बंधनकारक आहे,तसेच सामाजिक अंतर देखील राखणे आवश्यक आहे.जनतेनी जागरूकतेपणे आपली जबाबदारी समजून वागावे लागणार. असे ही  आवाहन त्यांनी केले आहे.असं केल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आपण स्वतःची आणि इतर लोकांची सुरक्षा करू शकतो.
 
सध्या राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.वेगवेगळ्या स्तरावर अनलॉक करत आहोत.मुंबई अद्याप तिसऱ्या स्तरावर आहे त्यामुळे सध्या लोकल सेवा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.मुंबई तिसऱ्या स्तरावरून पहिल्या स्तरावर आल्यावर आणि मुंबईची परिस्थिती सुधारल्यावर निर्णय घेण्यात येईल असे ही  वडेट्टीवार म्हणाले.